। माणगाव । प्रतिनिधी ।
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्या माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल या पतसंस्थेतर्फे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे वारसदार वडील तथा माणगाव पतसंस्थेचे सभासद यांना संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात आले.
या संस्थेचे सभासद किशोर जाधव यांचा मुलगा कै. केतन जाधव याचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात औषधोपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. केतन याचे वारसदार वडील यांना आर्थिक मदत म्हणून माणगाव ग्रामीण पतसंस्थेच्या सभासद कल्याण निधीतून आर्थिक सहाय्यतेचा धनादेश संस्थेचे चेअरमन आनंद यादव, संचालक दिलीप जाधव, संचालक नरेश राजपूत,संचालक संदीप खरंगटे, संचालक अरुण प्रभाळे यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी संस्थेचे व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड, लेखनिक राजेंद्र जाधव उपस्थित होते.