। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग मुरुड मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. सुनिता मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मेडिकल असोसिएशन ऑफ पोयनाड यांच्या सहकार्याने ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने विद्यार्थी मार्गदर्शन, पौष्टिक खाऊ वाटप व विनामूल्य दंत तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी (दि.1) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोयनाड येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ. मकरंद विष्णू पाटील, डॉ. विष्णू म्हात्रे, डॉ. ओंकार पाटील, डॉ. भक्ती ओंकार पाटील, डॉ. तक्षशिला चौबळ, डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. प्रशांत बैकर, डॉ.सुनिता बैकर उपस्थित होते. तसेच, डॉ. सुनिता मकरंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. डॉ. तक्षशिला चौबळ यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून योग्य सल्ला दिला. तसेच, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना टूथ ब्रश व टूथ पेस्ट वाटप केले. तर, राज्य कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेला जांभाचे फळ झाड भेट स्वरूपात देण्यात आले .