| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर फूडमॉलजवळ एका खासगी बसमधून प्रवासी लघुशंकेसाठी उतरून बसच्या पाठीमागे गेला होता. दरम्यान, तिथे असणारी शिवनेरी बस चालक मागे घेत असताना प्रवाशाला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून खासगी बसमधून मन्सूर बोहरी हे आपल्या गावी जात असताना बस खालापूर टोलनाकाजवळील राज ढाबा येथील पार्किंगमध्ये आली असता बोहरी हे लघुशंकेसाठी शिवनेरी बसच्या शेजारून जात होते. याचवेळी बस चालकाने बस मागे घेतल्याने बसचा जोरात धक्का लागल्याने मन्सूर बोहरी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ धाव घेतली. दरम्यान, बोहरी यांचा मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.