| सुतारवाडी | वार्ताहर |
रोह्यातीली जामगाव येथील राजिपच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठले वाडीच्या मधुकर चंदने यांच्या शेतावर जाऊन शेतीच्या कामांचा आनंद आणि अनुभव घेतला. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना भात पिकं लागवड तसेच शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी मुख्याध्यापिका प्रिया टोकसे विद्यार्थ्यांना शेतावर घेऊन गेल्या. मुलं-मुली शेतात उतरून प्रथम शेती मशागतीची माहिती त्यांना मधुकर चंदने यांनी सांगितली. प्रत्यक्ष भात रोपांची लागवड करताना ती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर विद्यार्थी शेतात उतरल्यानंतर पारंपारीक गाणी म्हणत भातरोप लावण्याचा अनुभव घेतला.