। अलिबाग । वार्ताहर ।
मॉर्निंग वॉक ग्रुप आंबेपूर-पेझारीच्या सदस्य श्रीगाव येथील भाजीविक्रेत्या निर्मला नारायण पाटील यांच्या 77 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकताच कृतज्ञता म्हणून मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
मॉर्निंग वॉक ग्रुप आंबेपूर-पेझारीतर्फे अध्यक्ष प्रकाश नागू म्हात्रे यांच्या सकल्पनेतून ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. त्यांच्याच हस्ते श्रीमती निर्मला नारायण पाटील यांचा पुष्पगुच्छ, मानपत्र, शाल, साडी देऊन 31 वा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उमाजी केळुसकर, अनिल पाटील, जी.सी. पाटील, विकास पाटील, नितीन पाटील, रामचंद्र म्हात्रे, सुनील राऊत, सुरेश पाटील, वैकुंठ पाटील, आर.जे. पाटील, संदेश पाटील, संतान पाटील, रमेश पाटील, नंदकुमार राऊत, पांडुरंग पाटील आदी मॉर्निग वॉक ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. तसेच, श्रीमती निर्मला पाटील यांचा संपुर्ण परिवार उपस्थित होता.