| बुलढाणा | वृत्तसंस्था |
बुलढाणा जिल्ह्यात एस टीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसला राष्ट्रीय महामार्गवर हा अपघात झाला. नांदुरा-मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रथमिक माहितीनुसार या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याच्या प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





