| नवी मुंबई | वार्ताहर |
नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल दरोडा टाकत सोन्याचे दुकान लुटलं आहे. खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्सवर रात्री 11 च्या सुमारास दरोडा पडला. तीन दरोडेखोर दुकानात शिरले, त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या. तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकान लुटलं. जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भरबाजारात ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बंंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं. त्यांनी दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला. या घटनेमुळे नागरिक आणि व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.