| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची सन्मित्र ट्रक वाहतूक संघ (मुरुड-अलिबाग)अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या निवडीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. गेले अनेक वर्ष त्यांनी सन्मित्र ट्रक वाहतूक संघाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. रक्तदान शिबीर नेत्र, तपासणी शिबीर असे अनेक उपक्रम राबवून चालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
अलिबाग येथील गुरुप्रसाद हॉटेलमधील सभागृहात सन्मित्र ट्रक वाहतूक संघाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत सन्मित्र ट्रक वाहतूक संघाचे चालक-मालक बहुसंख्याने उपस्थित होते. त्यात नवीन कार्यकारिणी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्रशांत नाईक यांची अध्यक्ष म्हणून पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी नंदकुमार मयेकर (अलिबाग), रमेश गायकर , सचिवपदी सुहेल कासकर, खजिनदारपदी नियाज खान, सल्लागारपदी मधु पाटील. यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून संदेश नाईक, सुजित नाईक, नयन गायकर, इमरान रज्जब, दीपक मयेकर, मुन्नवर खान, जावेद गोरमे, जुबेर सय्यद, शमशुद्दीन कासकर, व शपथ समिती सदस्य म्हणून आकाश नागोठकर, नजीर मगनाके, प्रशांत झोमराज, संपर्क समिती सदस्य म्हणून सय्यद खान, सुयोग रोटकर या सर्वांची निवड करण्यात आलेली आहे.