। खांब-रोहे । वार्ताहर ।
राष्ट्रीय स्वच्छता दिवसानिमित्त रोटरॅक्ट आणि रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलने मिळून मेगा ई-वेस्ट कलेक्शन ड्राइव्हचे आयोजन केले होते. रोह्याच्या मेहेंदळे हायस्कूल येथे हा प्रकल्प घेण्यात आला.एकूण 75 किलो ई-वेस्ट जमा करण्यात यश आले आहे. या कार्यक्रमात रोटरॅक्ट क्लब ऑफ रोह्याचे अध्यक्ष आकाश रुमाडे, सचिव सत्येन देशपांडे यांच्या निरीक्षणाखाली हा कार्यक्रम पार पडला. तसेच रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे अध्यक्ष कैलाश जैन व सचिव अजित तेलंगे देखील उपस्थित होते. रोटरॅक्टचे मेंबर्स सार्थक शिंदे, देवाश्री जंगले, आशुतोष नांदगावकर, सृष्टी वाणी, नील डिसोझा, प्रतीक्षा सानप, सुयोग शिंदे, सुवेद शिंदे, राशिद शेख, चिन्मय पोटे, मितेश गायकर, विनीत नारखेडे, भूषण टक्के या सगळ्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती.