। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील संभे ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन दि. 18 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्याचे उगमस्थान भैरीनाथ मंदिर येथील असून सोमवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजता या दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्यात विविध प्रकारचे धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून या दिंडीचे पूजनासाठी व दर्शनासाठी अनेक दिग्गज मान्यवर येत असल्याची परंपरा आजही कायम आहे.तर, सोहळ्याचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष तुकाराम बांदल, उपाध्यक्ष अनंत सानप, सेक्रेटरी पांडुरंग सानप, गणेश नलावडे, खजिनदार जितेंद्र दहिंबेकर, दत्ता तेलंगे आदी पदाधिकारी यांच्यासह दिंडीचे सर्व सदस्य तसेच ज्ञानेश्वर सत्संग वारकरी सेवा मंडळ संभे व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व वीर हनुमान क्रीडा मंडळ संभे हे सहकार्य करीत आहेत.