। कोर्लई । वार्ताहर ।
आगामी होणार्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच मुरुडमध्ये अलिबाग-मुरुड आणि रोहा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळा शिवसेना (उद्धव ठाकरे) उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, प्रशांत कासेकर, कुणाल सतविडकर, मनोहर बैले, मनोहर मकू, चंद्रकांत कमाने, अमित गोंजी, नरेश कुबल, मुग्धा जोशी, माई सुभेदार, उत्कर्षा धोत्रे, काँग्रेसचे अस्लम हलडे, नाना गुरव, इस्माईल शेख, शेतकरी कामगार पक्षाचे वामन चुनेकर, विजय गिद्दी, तुकाराम पाटील, चंद्रकांत कमाने, मनीष माळी, प्रयास वरसोलकर, प्रकाश मयेकर, यश पाटील यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.