। अलिबाग । वार्ताहर ।
पालघर क्रीडा संकुलात सोमवारी (दि.25) शालेय मुंबई विभागीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जय शोतोकाण कराटे अँड स्पोर्ट अकॅडमी संघटनेची तन्मई सुधीर पाटील हिने 19 वर्षाखालील 65 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
तन्मई पाटील ही पेझारीच्या ना.ना. पाटील हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. तन्मई ही संतोष कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षण सूर्योदय पेझारी साई मंदिर हॉल येथे घेत आहे. तसेच, ती नवीन मुलांना स्वतः प्रशिक्षण देत आहे. तन्मई ब्लॅक बेल्ट असून पंजाब येथे झालेल्या गतका मार्शल आर्ट या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे तिची महाराष्ट्र ऑलिम्पिकतर्फे होणार्या खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे.या यशाचे श्रेय तिने आई-वडील तसेच कराटे मुख्य प्रशिक्षक संतोष कवळे, राष्ट्रीय खेळाडू जिज्ञासा पाटील व शिक्षक पुरुषोत्तम पिंगळे यांना दिले आहे. तन्मईची पुणे बालेवाडी येथे होणार्या शालेय कराटे राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल ना.ना. पाटील हायस्कूलचे चेअरमन माजी आ. पंडित पाटील व मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.