| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बोपेले गावामध्ये राहणार्या एका कुटुंबातील 44 व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. तेथील नोकरदार पत्नीने आपल्या नवर्याला खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून कोणत्याही प्रकारची नोकरी करीत नसलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बोपेले गावातील एन्कीलव या गृहनिर्माण सोसायटी मध्ये राहणारे गायकर कुटुंबियातील शशांक गायकर हे दाम्पत्य तेथे राहत होते.शशांक यांची नोकरी गेली असल्याने काही महिने घरीच होते आणि कामधंदा नसल्याने घरी राहणार्या या तरुणाने दुपारी आपली पत्नी युगंधरा शशांक गायकर यांना मोबाईलवरून मेसेज पाठवून पाचशे रुपये पाठवण्याची मागणी केली. 18 डिसेंबर रोजी दुपारी मेसेज पाठवल्यावर शंशाक गायकर हे आपल्या नोकरी करीत असलेल्या पत्नीला सतत फोन करू लागले.त्यावेळी सतत येत असलेले फोन हे न उचलता ते फोन युगंधरा या कट करीत होत्या.शेवटी सतत येत असलेल्या फोनला कंटाळून युगंधरा गायकर यांनी आपले पती शशांक गायकर यांचा मोबाईल फोन ब्लॉक केला.
शेवटी पाचशे रुपये मिळाले नसल्याने आणि फोनदेखील उचलत नसल्याने पत्नी युगंधरा यांचा राग आल्याने रंगाच्या भारत शंशाक शाम गायकर 44 यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती सायंकाळी साडेपाच वाजता कळल्यावर नेरळ पोलीस ठाण्यात त्याबद्दल महिती देण्यात आली. शेवटी नेरळ पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद 19 डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. नेरळ पोलीस ठाण्यात शशांक गायकर यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.