। अलिबाग । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील वावोशी येथील पीएनपी इंग्रजी माध्यम शाळेमध्ये प्रभाविष्कार या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्राची लोकधारा, देशभक्तीपर नृत्य, राजस्थानी, कोळी नृत्य, समाजातील विविध व्यसनांवर नाटक, रेट्रो गाणी, कौटुंबिक बंध आणि रामायण यावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
प्रभाविष्कार सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, उद्योजक मयुरेश प्रोटीन्स कंपनीचे श्यामशेठ अग्रवाल, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, वावोशी पोलीस उपनिरीक्षक आलोक खिदमतराव, गोरठाण बुद्रुकचे माजी सरपंच किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील, शाळा समिती अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष प्रमोद जाधव, शेकाप जेष्ठ नेते शांताराम पाटील, मुख्याध्यापिका पूनम फुलारी, उपमुख्याध्यापीका सोनाली जाधव, सांस्कृतिक प्रभारी प्रतीक्षा लोटे, पीएनपी मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी, सर्व समिती सदस्य, पिटिआय सदस्य आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.