। बोर्ली-पंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत नुकतेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले हाते. शालेय विद्यार्थांच्या क्रिडा व कलागुणांना उत्तेजन मिळावे यासाठी अदानी दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या सौज्यन्याने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
अदानी दिघी पोर्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी, क्रिकेट, खो-खो अशा विविध क्रीडा स्पर्धेचे वडवली शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आणि संघाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अदानी फाउंडेशन दिघी पोर्टच्या उपप्रकल्प व्यवस्थापक जयश्री काळे तसेच अवधूत पाटील, मुख्याध्यापक नितीन मोकल, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, स्वप्निल बिराडी, दीपक कांबळे, सुकृत मांजरेकर, निलेश नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.






