| नेरळ | प्रतिनिधी |
बेडीसगाव आणि परिसरातील सात आदिवासी वाड्या यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरवडा यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कर्जत तालुका बहू आदिवासी भाग असून आदिवासी सामाजाची उन्नतीसाठी व्हावी यासाठी कर्जत तालुका आदिवासी संघटना प्रयत्न करीत आहेत. आदिवासी समाजातील लोकांमध्ये वाद होऊ नयेत आणि समाज गुण्यागोविंदाने नांदत राहावा यासाठी आदिवासी संघटना प्रयत्न करीत आहे. त्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी विविध सरकारी योजनांच्या माध्यमातूनदेखील संघटनेचा प्रयत्न सुरू असतो. हे प्रयत्न आदिवासी समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या माध्यमातून बेडीसगाव आणि परिसरातील सात आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात आदिवासी कार्यकर्ते आणि कर्जत आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कर्जत पंचायत समिती माजी सभापती आणि आदिवासी संघटना महिला अध्यक्ष जयवंती हिंदोळा तसेच बाळकृष्ण पादीर, दत्तात्रय हिंदोळा, जोमा निरगुडा, राजू झुगरे, माजी उपसरपंच बुद्धी दरवडा, अशोक वाघ, मनोहर भूमना, गोमा निर्गुडा, मधुकर ढोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





