नेरळ | वार्ताहर |
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद मधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एका स्वीकृत नगरसेवकाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात त्या सर्व 10 नगरसेवक यांना अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान,जून 2021 पासून त्या याचिकेवर सुनावणी झाली नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्या याचिकेवर तारीख पे तारीख देत असून आता आज न झालेली सुनावणी उद्या 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हाधिकारी ऐकत नाहीत काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे.
माथेरान येथील 2016मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून लढवीत असलेल्या नऊ आणि एका स्वीकृत नगरसेवकाने मे 2021 राजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या मुंबई दादर येथील कार्यालयातून सूत्रे हलली आणि दुसर्यांदा दिवशी शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव खासदार अनिल देसाई यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या सर्व 10 नगरसेवक यांना पक्षबंदी नियमानुसार अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या त्या अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 30 जून 2021 रोजी सुनावणी लावण्यात आली. त्यावेळी केवळ अर्ज सादर करून घेण्यात आले आणि पुढील सुनावणी 5 जुलै रोजी घेण्यात येणार आली. त्या सुनावणीत भाजपात प्रवेश क्जरणार्या 10 नगरसेवक यांच्याविरोधात वेगवेगळे रिट पिटिशन माथेरान नगरपरिषद मधील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी दाखल केले होते. त्या रिट अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 19 जुलै हि तारीख सुनावणीसाठी दिली.मात्र 19 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे ती सुनावणी रद्द करण्यात आली आणि रद्द झालेली सुनावणी 2 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. 23 ऑगस्ट रोजी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत युक्तिवाद करण्यासाठी 21ऑगस्ट हि तारीख दोन्ही बाजूना देण्यात आली.
मात्र 23 ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार्या नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिकेवर अंतिम निर्णय होणार असे माथेरानकरांना वाटत होते. मात्र 21 ऑगस्ट रोजी रायगडाच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यामुळे नव्याने जिल्हाधिकारी पदावर विराजमान झालेल्या डॉ महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्धिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तब्ब्ल दोन महिन्यात म्हणजे आज 25 ऑक्टोबर रोजी माथेरान मधील भाजपात प्रवेश करणार्या नगरसेवक यांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी लावली. मात्र आज देखील रायगड जिल्हाधिकारी यांनी त्या रीत पिटिशन अर्जावर सुनावणी घेतली नाही.मात्र पुढची सुनावणी उद्या 26 ऑक्टोबर रोजी घेणायचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालय कडून देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता आहे हे काळात नाही अशी चर्चा रंगू लागली आहे. राज्यात शिवसेना पक्ष सत्तेवर असताना याच पक्षाचे पक्षचिन्हावर निवडून आलेले नऊ नगरसेवक आणि एक स्वीकृत नगरसेवक यांच्या अपात्रतेची अर्जावर अंतिम निर्णय रायगड जिल्हाधिकारी घेत नाहीत. हि बाब राज्यात सत्ता असलेली महाविकास आघाडीची निश्चितच भूषणावह बाब नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादिओ काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही राजकीय पक्षांचा प्रमुख विरोधी पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. असे असताना राज्यातील एक जिल्हाधिकारी भाजपात प्रवेश करणार्या नगरसेवक यांच्या अपात्रतेची रिट पिटिशन अर्जावर निर्णय देत नाही.
राज्यात सत्ता कुणाची?
5 जुलै रोजी शिवसेना पक्ष सोडून भाजपात गेलेल्या सर्व 10 नगरसेवक यांच्या अपात्रतेबाबत वेगवेगळे रिट पिटिशन दाखल केले. त्या रिट पिटिशन वर खरेतर 90 दिवसात निकाल देणे आवशयक असते. मात्र अनेकदा सुनावणी रद्द करणे,युक्तिवाद न होणे हि करणे या याचिकेबाबत सतत होत आहेत आणि त्यामुळे या रिट पिटिशन अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्यावर वेगळ्या शक्तीचा दबाव आहे काय? असा प्रश्न आम्हाला सतावत आहे. आम्ही केवळ निर्णय मागत असून रायगड जिल्हाधिकारी सुनावणी सतत पुढे ढकलत असून राज्यात नक्की सत्ता कोणाची आहे आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्यावर शासनकर्त्यांच्या अंकुश आहे कि नाही अशी शंका यानिमित्ताने पुढे आली आहे.