| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अध्यक्ष मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकताच लायन्स क्लब मांडवाने ऑक्टोबर सेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. या उपक्रमाचा शुभारंभ रिजन चेअरमन अरविंद घरत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. लायन्स क्लब मांडवाच्या या विविध समाजोपयोगी कामांचे कौतुक सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व उपक्रमास प्रांतपाल अनिल जाधव, रिजन चेअरमन अरविंद घरत, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष मोहन पाटील, नितीन अधिकारी, अमिष शिरगावकर, अभिजित गुरव, अजय आंगणे, धवल राऊत, जितेंद्र ठाकूर, जितेश्री ठाकूर, सुमित पाटील, डॉ. राजाराम हुलवान, बी.एन. कोळी, डॉ. राजेंद्र मोकल, सतीश म्हात्रे, सुबोध राऊत, सुमित पाटील, हर्षद पाटील, विद्या अधिकारी, मानसी पाटील, सारिका पाटील, मीनल ठाकूर, उज्ज्वला पाटील, गीता कुलपे, समता राऊत, सुश्मिता घरत, चंद्रकांत मल्हार, सृष्टी दळी व वरुण मोघे, मायक्रो मेंबर नयन कवळे, शुभदा कुडतलकर, सासवणे सरपंच संतोष गावंड, निलेश खोत, श्रीकांत शिंदे, सविता साळशिंगीकर, सुमंगला कोळी आदी उपस्थित होत्या.