• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रिलायन्सविरोधात शेतकरी आक्रमक

Antara Parange by Antara Parange
April 1, 2025
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रिलायन्सविरोधात शेतकरी आक्रमक
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील स्थानिक, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्‍वासार्ह हमी आजवर दिलेली नाही. याविरोधात येथील शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी येथील स्थानिक, शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांनी दि. 1 एप्रिलपासून बेणसे सिध्दार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे.

आमरण उपोषणास बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्मिता कुथे, कल्पना अडसुळे, योगेश अडसुळे, सचिन कुथे, हे चार जण आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणकर्त्यांना विभागातील शेतकरी व स्थानिक भूमीपुत्रांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळाले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, उपाध्यक्ष विजय एटम, माजी सरपंच आ.का. म्हात्रे, दत्तात्रेय सुरावकर, शेतकरी सदानंद पाटील, मीराबाई गोरे, विठाबाई माळी, तुळसाबाई तरे, आसिफ मोमीन, संदीप कुथे, नंदा अडसुळे, उषा पवार, रेणुका अडसुळे, निकिता अडसुळे, सुषमा अडसुळे, मनोज कुथे आदींसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठका घेऊन आश्‍वासने देत आहे, यातून प्रकल्प बाधित घटकांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही तक्रार व मागणीवर रिलायन्स व्यवस्थापन न्यायिक भूमिका घेत नसल्याचे बेणसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी सांगितले. आमच्या मागण्या जलदतेने मान्य केल्या नाहीत तर येत्या दोन दिवसात अधिक उग्र आंदोलन करू, असा इशारा माजी सरपंच आ.का. म्हात्रे यांनी दिला आहे.

बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पसंदर्भात संघर्ष समिती व रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन व प्रशासन यांच्यात उमंग, इस्टेट ऑफिस, व प्रांताधिकारी कार्यालय पेण येथे स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी व नागरिक यांच्या विविध प्रश्‍न व समस्यांबाबत वारंवार बैठका होऊन आश्‍वासने देऊन सकारात्मक चर्चा होऊनदेखील आजतागायत एकही विषय मार्गी लावला नाही. आंदोलनकर्त्यांनी तक्रारी अर्जाद्वारे मंत्रालय स्तरावर, तसेच रायगड जिल्हा व तालुका प्रशासनाकडे प्रामुख्याने नमूद दिलेल्या मागण्यांत ई.डी.पी.एल लाईन एक वर्षांपासून लिकेज झाल्याने शेतकर्‍यांचे, मच्छिमार व पशुपालक यांच्या व्यवसायावर केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे व आजही होत आहे. या नुकसानग्रस्त घटकांची आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते, मात्र आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी. तसेच नवीन प्रकल्पाच्या मातीच्या भरावामुळे सर्व व्यवसायिक व शेतकरी यांचे कायमस्वरूपी नुकसान होणार असल्यामुळे या घटकाला उदरनिर्वाहाच्या दृष्टीने शिक्षण व गुणवत्तेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केले होते, तसेच बीएससी, डिग्री, डिप्लोमा व आयटीआय व फायर मॅन यांना सध्या चालू असलेल्या रिलायन्स कंपनीत कामाला कायम स्वरूपी सामावून घेण्याचे मान्य केले होते, त्या सर्व मुलांची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

दिलेली आश्‍वासने, प्रलंबित मागण्या व समस्या यांची सोडवणूक न करता पोलीस बळाचा वापर करून स्थानिक शेतकरी, मच्छिमार, पशुपालक अन्नदाते यांना धमकावू नये. मातीच्या भरावाने बेणसे झोतीरपाडा व अन्य नागोठणे विभागात महापूर परिस्थिती अधिक उद्भवण्याची भीती आहे, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन यांनी प्रभावी व ठोस उपाययोजना करावी. जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत काम बंद ठेवावे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा देत वरील मागण्यांच्या अनुषंगाने शेतकरी व स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे. उपोषणादरम्यान आमच्या जीविताला काही हानी अथवा धोका निर्माण झाल्यास त्यास रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Related

Tags: hunger strikeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/ bense newspali/benseraigadreliance companysocial media newssocial news
Previous Post

कोरटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

Next Post

पीओपीच्या गणेशमूर्तींना वाढती मागणी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्राईम

पती-पत्नीला 20 वर्षांची शिक्षा

April 12, 2026
दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
sliderhome

खालापूर आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार

April 12, 2026
Next Post
पीओपीच्या गणेशमूर्तींना वाढती मागणी

पीओपीच्या गणेशमूर्तींना वाढती मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?