| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
फ्लॅटचा ताबा न देता दिलेली रक्कम परत न केल्याने पंकज शंकरलाल भानुशाली (ऐरोली), दिनेश शंकरलाल भानुषाली आणि मुकेश दिनेश भानुशाली यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरजीत मेकअप हे नेरूळ येथे राहात असून, त्यांनी व त्यांच्या मित्रांनी 2013 मध्ये फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यांनी पनवेल तालुक्यातील पिसार्वे येथील मेसर्स मारवल लाईफ स्पेसेस फार्म यांच्या साई शांती पार्क या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याचे ठरवले. या फॉर्मचे मालक पंकज भानुषाली, दिनेश भानुषाली, मुकेश भानुषाली होते. त्यानुसार त्यांनी साडेतीन लाख रुपये दिले. यावेळी 2019 पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर पुन्हा सात लाख 35 हजार रुपये चेकने देण्यात आले. 2015 मध्ये प्रोजेक्टचे काम सुरू झाले, मात्र 2017 मध्ये ते थांबवण्यात आले होते. यावेळी भानुशाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वारंवार आश्वासन दिले. 2013 पासून दिलेले दहा लाख 85 हजार रुपये परत केले नाहीत आणि फ्लॅटचा ताबाही दिला नाही. त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.