| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
कारमधून आलेल्या चार अनोळखी गाडीतील डिझेलची चोरी केली आणि दोन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कमलेश मीना हे राजस्थान येथील असून, ते टाटा ट्रकवर चालक म्हणून काम करतात. राजस्थान येथून श्री साई मार्बल शिव मंदिराजवळ, खुटारी गाव(तळोजा) येथे मार्बल भरून खाली करण्यासाठी पोहोचले. यावेळी लाल रंगाच्या ब्रिजा कारमधून चार अनोळखी उतरले आणि त्यांनी ट्रकमधून डिझेलची चोरी केली. त्यानंतर ट्रकमध्ये ठेवलेल्या दोन मोबाईलची चोरी करून ते घेऊन गेले.