| श्रीवर्धन शहर | वार्ताहर |
देहरादून येथे संपन्न झालेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत म्हसळाचा विक्रांत खांडेकर यांने आपल्या उत्कृष्ट खेळाच प्रदर्शन केले. त्याने अंतिम चारमध्ये स्थान मिळवत कांस्यपदक पटकावून रायगड जिल्ह्यासह म्हसळा गावाचे नाव उंचावले आहे. देशातील या अधिकृत आणि नामांकित स्पर्धेमध्ये देशातील एकुण 20 पेक्षा जास्त राज्यांनी सहभाग नोंदविला होता. चॅम्पियन्स कराटे क्लबने नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 (कॅडेट, ज्युनियर आणि सब-ज्युनियर)मध्ये एकूण 3 सुवर्ण, 2 रौप्य, 5 कांस्यपदके मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम स्थान पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.







