। पंढरपूर । प्रतिनिधी ।
श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज्, या महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ममिशन युवा स्वास्थ लसीकरण शिबिरफ पार पडले आहे.
या लसीकरणासाठी के.व्ही.मोरे. लसीकरण परिचारिका, एस.एम.माने समन्वयक, आर.के.सोनवले, आर. जी.मोरे व आशा वर्कर्स यांचे बहुमोल सहकार्य लाभले. दुपारी 04:30 वाजेपर्यंत 33 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य. डॉ.ए.एस भोईटे यांनी दिली. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल, उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रमुख प्रा.एस.व्ही.भोसले यांनी केले तर आभार प्रा.एस.व्ही.व्यवहारे यांनी मानले.