साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
| खरोशी | वार्ताहर |
ॐ मित्र मंडळ वडगांवतर्फे साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त बुधवार दि. 10 ते शुक्रवार दि. 12 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवारी (दि.10) सकाळी 9.00 वा. श्रींची प्रतिस्थापना संग्राली रोशन नारायण पाटील यांच्या हस्ते होणार असून सकाळी 11.30 वा. महाआरती, तर सायं. 6.30 ते 7.30 वा. ह.भ.प. रघुनाथ रसाळ महाराज यांचे प्रवचन होणार आहे. तसेच, रात्री 7.30 ते 8 वा. अथर्वशिर्ष सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री 8 ते 8.30 वा. महाआरती तर रात्री 9.30 वा.भजन स्पर्धा होणार आहेत.
तसेच, गुरुवारी (दि.11) सकाळी 11 वा. महाआरती सायंकाळी 6.30 ते 8 वा. तुळजा भवानी भजन मंडळ वडगांव यांचा भजनाचा कार्यक्रम सायं. 8 ते 8.30 वा. त्यानंतर महाआरती रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत होईल. बक्षीस वितरण गणेश सजावट रात्री 9.30 वा., योगेश आग्रावकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वराविष्कार होणार आहे. तर शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.12) सकाळी 11 वा. महाआरती सायं. 4 वा. महाआरती झाल्यानंतर भव्य मिरवणुक विसर्जन सोहळा सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॐ मित्र मंडळ व्यायाम शाळा वडगांव-पेण यांच्या वतीने करण्यात आले आहे.






