पेण | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत वरवणे येथील झापडी या गावामध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड.आर.एच.म्हात्रे यांनी उपस्थित ग्रामस्थांना कुळकायदा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच अॅड. भक्ती पाटील यांनी महिलांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले. व अॅड.गणेश म्हात्रे यांनी विधी सेवा समीतीचे कार्य स्त्री भ्रुण हत्या या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच श्री.संदिप तोंडीलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अॅड. नितिन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमास वरवण सरपंच हिराबाई मानकर, उपसरपंच यमुना वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप पाटील, पंच कमिटी अध्यक्ष श्री.मानकर काका, पोलीस पाटील श्री राजू पाटील, माजी सरपंच रमेश दळवी, श्रावण वाघमारे, गौरी हिलम, गुलाब हिलम व गावातील ग्रामस्थ, पेण पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेण न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.