। पनवेल । वार्ताहर ।
चिंचवण गावासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रस्त्याचे काँक्रीटिकरण करण्यात येत असून, नुकताच या कामाचे भूमीपूजन पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राम भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामासाठी आ. बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
या कार्यक्रमास सांगूर्ली ग्रामपंचायत सरपंच पद्माकर कातकरी, उपसरपंच वसंत पाटील, शेकाप जेष्ठ नेते महादेव पाटील, माजी उपसरपंच सचिन खुटले, उद्योगपती श्याम ठोंबरे, पुरोगामी युवक संघटना पनवेल तालुका उपाध्यक्ष अमित भोईर, सुनील म्हसकर, सदानंद खुटले, नरेश पाटील, भास्कर पाटील, जगदीश पाटील, काशिनाथ खुटले, केशव ठोंबरे,शिवाजी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.