| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
वक्रतुंड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पाली देऊळवाडा वास्तूचा वास्तुशांती समारंभ शुक्रवारी (दि.28) संपन्न झाला. या वास्तुशांतीनिमित्त वक्रतुंड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाच्या कल्पनेतून निर्माण झालेले घरगुती जलशुद्धीकरण प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली. या जलशुद्धीकरण जोडणीसाठी 3 प्लास्टिक ड्रम, गोठे, रेजगा, वाळू, कोळसा, जाळी या साहित्याचा वापर करून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेमुळे पाली नगरपंचायतच्या वतीने येणारे आंबा नदीचे पाणी शुद्ध करून सोसायटीमधील नागरिकांच्या वतीने नियमितपणे वापरण्यात येणार आहे. यावेळी या कार्यक्रमानिमित्त नम्रता ब्रीद यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम तसेच सोसायटीच्या वतीने उपस्थित नागरिकांना स्नेहभोजन आणि रात्री सुस्वर भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
पाली नगरपंचायतिच्याद्वारे येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवर घरगुती जलशुद्धीकरण प्रक्रिया योजना करून या सोसायटीने पालीकरासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
– सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत पाली







