| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे इलेक्ट्रॉनिक मीटर प्रीपेड विरोधात तालुका चिटणीस रवी घरत, ज्येष्ठ नेते काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबीला जाब विचारण्यात आला.
अदानी कंपनीचे घरटी मीटर लावण्याचे एमएसईबीने बंद करावे. यावेळी तालुका चिटणीस रवी घरत यांनी सांगितले की, आमची लढाई इलेक्ट्रॉनिक मीटर प्रीपेड विरोधात आहे. या कंपनीचे मीटर बसविण्यात आमचा विरोध आहे. यासाठी आम्ही आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयात धडक दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते काका पाटील म्हणाले, अदानी कंपनीचे प्रीपेड मीटर भविष्यात घातक असून त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांचे हक्क हिरावून घेतले जातील. यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा या प्रीपेड मीटरला सक्त विरोध आहे. यावेळी पंचायत समितीचे सदस्य महेश म्हात्रे, माजी उपसभपती महादेव बंडा, अनंत घरत व प्रमुख कार्यकर्ते हजर होते. यावेळी रवी घरत यांनी एमएसईबीचे अधिकारी गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. जर इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे बंद केले नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन, मोर्चा, घेराव सारख्या संविधानिक मार्गाचा अवलंब केला जाईल, असे चिटणीस रवी घरत यांनी एमएसईबी अधिकाऱ्यांना सांगितले.






