| पेण | प्रतिनिधी |
खारपाले गावचे मा. मंत्री भाई मोहनराव पाटील यांचे खंदे समर्थक जनार्दन देवजी गावंड यांचे वृध्दपकाळाने नुकतेच निधन झाले असून, कासू विभागात सहकार राबवण्यामागे जनार्दन गावंड यांचे मोलाचे सहकार्य भाई जयंतभाई पाटील यांना लाभले. त्यांनी विविध कार्यकारी सहकारी खारपाले संस्थेचे चेअरमन तसेच विविध कार्यकारी सहकारी गडब संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात मुलगा माणिकराज हे त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवत असून, माणिकराज हे वेगवेगळ्या सामाजिक संस्थामध्ये काम करून गरीब गरजू लोकांना मदत करत आहेत. जनार्दन गावंड यांच्या पश्चार्थ मुल, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्यावर अत्यसंस्कार खारपाले येथील स्मशानभुमीत झाले त्यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.







