| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावातील गावदेवी क्रीडामंडळ बाहे यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात गावदेवी धानकान्हे आदिवासीवाडी संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करून विजेतेपद पटकावले आहे.
क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेदरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अनंत थिटे, मराठी उद्योजक नारायण कान्हेकर, निलेश शेडगे, प्रफुल्ल वाळंज, सुनील थिटे सर, विजय नाकटे, संतोष थिटे, गणेश तु. पवार, रोशन मोरे, रुपेश बामुगडे, गणेश पवार, सचिन देवकर आदी उपस्थित होते. तर स्पर्धेतील उपविजेतेपदाचा मान भैरवी मालसई संघाला मिळाला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज नरेश वाघमारे (धानकान्हे), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ऋतिक पवार (धानकान्हे) तर मालिकावीर. सुयोग आयरे (भैरवनाथ मालसई) यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे समालोचन चिपळूण येथील सिद्धेश इंदुलकर यांनी केले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी बाहे क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य व क्रिकेट खेळाडू यांनी मोलाचे सहकार्य केले.






