| उरण | प्रतिनिधी |
उरण येथील रायगड जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 14 उमेदवार, तर उरण पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 23 उमेदवार उभे असून शनिवारी (दि.7) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी एकूण 135 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आविशकुमार सोनोने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी हे जातीने लक्ष घालून होते. त्यामुळे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळले तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यादरम्यान उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषदेच्या पाणजे मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये आवाज येत नसल्याने थोडावेळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.






