। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या बामणडोंगरी गावात बनावट नोटाप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून 30 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसारउल्ला हक नाझिर शेख असे आरोपीचे नाव असून तो ज्यूस विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडून एकूण 500 रुपयाच्या 30 हजार 500 रुपये किमतीच्या 61 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट नोटा व्यवहारात वापरण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःच्या ताब्यात बाळगल्या होत्या, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







