| उरण | प्रतिनिधी |
सद्गुरू बाबा हरदेव सिंह यांच्या वाढदिवस निमित्त संत निरंकारी मिशन उरण यांच्या माध्यमातून रविवारी (दि.22) उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात 600 स्वयंसेवक उत्स्फुर्त सहभागी झाले होते. पिरवाडी समुद्र किनारपट्टी स्वच्छ केली. देशभरात रविवारी ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानांतर्गत जवळपास 2 हजार ठिकाणी जलाशय सफाई मोहीम हाती घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून उरणमधील नागाव समुद्रकिनारा येथे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान पार पडले. मोहिमेदरम्यान प्लास्टिक, काच, थर्माकोल व इतर घनकचऱ्याचा 600 बॅगा गोळा करण्यात आला. ही मोहीम संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चारिटेबल फाऊंडेशन यांच्या आयोजनातून, सदुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या प्रेरणेने पार पडली.







