| मुंबई | प्रतिनिधी |
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात खेळवण्यात आला. यात भारताने 7 विकेटने विजय मिळवत चौथ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 253 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बेथलच्या विक्रमी शतकाच्या बळावर इंग्लंडनही दमदार फलंदाजी केली. मात्र ते सात धावांनी कमी पडले. त्यांचा डाव 20 षटकांत 246 धावांपर्यंत मर्यादित राहिला. यासह भारतीय संघ फायनलमध्ये जाणारी श्रीलंकेनंतर दुसरी होस्ट टीम बनली आहे. श्रीलंकेने 2012 मध्ये हा कारनामा केला होता. आता भारतीय रविवारी 8 मार्च रोजी अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे.
भारताने दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. साल्टला पांड्याने 5 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या ब्रूकला बुमराहच्या गोलंदाजीवर अक्षरला 7 धावांवर झेल दिला. बटलर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण फिरकी गोलंदाज वरुणने त्याला 25 धावांवर बाद केले. बटलर बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 3/64 होती. यानंतर जॅक्स आणि जेकब बेथलनं 76 चेंडूची भागीदारी करत इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या. जेकब बेथलने 105 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आलं. अखेर त्यांचा डाव 20 षटकांत 7 बाद 246 धावांवर मर्यादित राहिला. गोलंदाजीत पांड्याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानें नर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 253 धावांचा हिमालय उभारला. संजू सॅमसन पुन्हा एकदा भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला. त्यानं 42 चेंडूत 89 धावांची खेळी केली. यात आठ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. मात्र, अभिषेकची बॅट पुन्हा काम करु शकली नाही आणि तो फक्त 9 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशाननं 18 चेंडूत 39 धावांची शानदार खेळी केली. शिवम दुबेने 25 चेंडूत 43 धावा केल्या. हार्दिकने 12 चेंडूत 27 धावा केल्या आणि तिलकने फक्त सात चेंडूत 21 धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजीत आदिल रशिद आणि विल जॅक्सनं प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
सर्वाधिक नॉकआउट धावसंख्या
भारताचा 253 धावांचा स्कोर अनेक प्रकारे ऐतिहासिक आहे. टी-20 विश्वचषकाच्या नॉकआउट इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय संघाचा या फॉरमॅटमधील हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे, याच वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी केलेल्या 256 धावांच्या मागे. श्रीलंकेच्या केनियाविरुद्ध 2007 च्या 260 धावांच्या विक्रमापासून भारतीय संघ फक्त सात धावांनी कमी पडली, पण सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात 253 धावा करणं हा स्वतःमध्ये एक जागतिक विक्रम आहे.







