| पनवेल | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कापड बाजार येथे उत्साहात पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन बाळाराम पाटील आणि शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, गटनेते केतन भगत, नगरसेवक लतीफ शेख, प्रकाश म्हात्रे, नगरसेविका मनीषा म्हात्रे, दीपक घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सदानंद शिर्के, सूर्यकांत म्हसकर, उज्वला गावडे, अश्विनी देसाई आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.







