। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील कराडे खुर्द गावाजवळील बेलेंट्रा सोसायटीतील श्री गणेश मंदिराचा बंद दरवाजा उघडून मंदिरात ठेवलेल्या दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांना मुसक्या आवळण्यात यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस सुधीर मोरे, पोलीस शरद फरांदे पोलीस रणजितसिंह खराडे यांनी महत्वाची कामगिरी बजावली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी एकनाथ उर्फ इक्या सिताराम कातकरी (25) पेरुची वाडी, चावणे येथील असून त्याला मंदिरातील दानपेटीत 10रु, 20रु, 50रु, 200रु. दराच्या भारतीय चलनातील नोटा व नाणी चोरल्याचे त्याने कबूल केले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस पूनम शेळके अधिक तपास करीत आहेत.







