• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 5, 2026
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तहसीलदारांचे कारवाईकडे दुर्लक्षचा आरोप

| मुरुड | प्रतिनिधी |

मुरुड-जंजिरा तालुक्यातील उसडी येथे बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि दगड खाण प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनाने यापूर्वी कोट्यवधींची कारवाई करूनही पुन्हा उत्खनन सुरू झाल्याने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, प्रशासनाविरोधात उघड नाराजी व्यक्त होत आहे. तहसीलदारांकडे तक्रार करुनही राजकीय वरदहस्तामुळे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दगड खाणीमुळे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर या खाणीपासून काहीच अंतरावर असलेल्या चिचघर धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला असून, धरणाला काही धोका झाल्यास उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा गंभीर फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ही खाण महामार्गालगत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.



दरम्यान, बेकायदेशीर उत्खननावर कारवाई होत नसल्यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवासी महेश जानू ठाकूर (रा. मिठागर, पो. सावली, ता. मुरुड-जंजिरा) यांनी 1 एप्रिल 2026 रोजी तहसीलदारांकडे याबाबत सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मौजे उसडी येथील गट क्रमांक 170, क्षेत्र 0-50-90 हेक्टर या मिळकतीवर अस्लम इस्माईल कादरी (रा. दत्तवाडी, मुरुड) यांच्या नावावर सातबारा असून, कोणतीही शासकीय परवानगी न घेता येथे बेकायदेशीर दगड उत्खनन व स्टोन क्रशर सुरू आहे. महेश ठाकूर यांनी यापूर्वीही तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. उलट, राजकीय दबावामुळे खाणमालकावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, याच प्रकरणात प्रशासनाने पूर्वी कारवाई करत सुमारे 65 ते 66 लाखांचा दंड ठोठावला होता, तसेच अंदाजे तीन कोटींची वाहने जप्त केली होती. याशिवाय, सरकारी गुरचरण जमिनीवरील अनधिकृत उत्खननप्रकरणी पोलिसांत गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा उत्खनन सुरू झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधितांनी दंडाची रक्कम न भरता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पुन्हा काम सुरू केल्यामुळे चिचघर, आगरदांडा आणि उसडी परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पर्यावरणीय हानीबरोबरच शेतीचेही नुकसान वाढले आहे.

महेश ठाकूर यांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत, तातडीने कारवाई न झाल्यास उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अस्लम इस्माईल कादरी यांच्या मिळकतीवरील स्टोन क्रशरची तात्काळ पाहणी करून ते बंद करण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या तक्रारीची प्रत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी, रायगड (खनिकर्म) यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे. या प्रकरणामुळे उसडी, सावली, आगरदांडा व परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, बेकायदेशीर खाणींमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व आर्थिक नुकसानीविरोधात पुन्हा आवाज उठू लागला आहे. आता महसूल प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिचघर धरणाला वाढता धोका
उसडी येथील बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि दगड खाणीच्या अगदी वरच्या बाजूस असलेल्या चिचघर धरणाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या धरणातून राजपुरी, आगरदांडा, मिठागर, उसडी, खामदा, सावली, टोकेखार आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, स्टोन क्रशरमुळे होणाऱ्या सततच्या हादऱ्यांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. जर ऐन उन्हाळ्यात धरणाला काही अपघात झाला, तर अनेक गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळू शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तरीही प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

उसडी येथील बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि दगड खाणीविरोधात वारंवार तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करत आहे. आता मी कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार असून, न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषण करणार आहे.

महेश ठाकूर,
तक्रारदार

Related

Tags: Illegal stone crusher and stone quarry caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadRevenue Departmentsocial media news
Previous Post

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम
मुरुड

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

April 5, 2026
कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये
कर्जत

कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये

April 5, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
अलिबाग

रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
अलिबाग

मापगाव प्रीमियर लीग उत्साहात

April 5, 2026
लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ
उरण

लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?