| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभा आयोजित ब्राह्मण प्रीमिअर लीग येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलच्या सुसज्ज मैदानावर जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत केके टायटन्स्, वैद्य वॉरियर्स, एनएम 11, एसए 11, व्हिके विप्रा व कुलकर्णी मंडप या सहा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. उपेंद्र सुगवेकर, चंदन भडसावळे, भालचंद्र जोशी व दीपक बेहेरे, महेश वैद्य, संजीव दातार, विशाल जोशी व ॲड. गायत्री परांजपे यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत महेश वैद्य यांचा वैद्य वॉरियर्स हा संघ अंतिम विजेता ठरला असून, यश करंदीकर व रोहित कानडे यांचा केके टायटन्स् हा संघ उपविजेता ठरला आहे. स्पर्धेच्या बक्षिस समारंभावेळी परशुराम मंडळाचे संचालक विश्वजित देशपांडे, माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, निशांत जोशी, भालचंद्र जोशी, गौरी जोशी व प्रदीप गोगटे उपस्थित होते. संस्थेचे सचिव विशाल जोशी समवेत ऋषिकेश दातार, सार्थक घरलुटे, दिपंकर सालये, तुषार जोशी यांनी सामने अतिशय सुनियोजितपणे आयोजित केले होते.







