• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

सुपारी संशोधन केंद्र कागदावरच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 13, 2026
in रायगड, शेती, श्रीवर्धन
0 0
0
सुपारी संशोधन केंद्र कागदावरच
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन वर्षांनंतरही कामाला मुहूर्त नाही; रोठा सुपारीच्या भवितव्याचा प्रश्न

| बोर्लीपंचतन | मकरंद जाधव |

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे प्रस्तावित असणाऱ्या विस्तारित सुपारी संशोधन केंद्राच्या कामाला दोन वर्षांनंतरही सुरुवात न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे तसेच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

सुमारे पाच एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या संशोधन केंद्रातून जिल्ह्यातील सुपारी उत्पादकांना संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. या केंद्रामुळे श्रीवर्धनसह लगतच्या तालुक्यांतील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावेल, सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यास चालना मिळेल, तसेच कृषी पर्यटनालाही गती मिळेल, अशी आश्वासने देण्यात आली होती. याशिवाय स्थानिक फळे, फुले, भाजीपाला व मसाल्यांच्या पिकांवर संशोधन, तसेच महिलांसाठी प्रक्रिया उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम सूरु न झाल्याने ही आश्वासने केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिल्याची भावना आता बळावू लागली आहे.

बदलत्या हवामानामुळे सुपारी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी रोग व्यवस्थापनाच्या अभावामुळे श्रीवर्धनची ओळख असलेल्या दर्जेदार ‘रोठा सुपारी’च्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, त्याचा थेट फटका स्थानिक सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. भूमिपूजनानंतर दोन वर्षे उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नसल्याने संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि कृषी विद्यापीठ प्रशासन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात कधी मार्गी लावणार, याकडे आता संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे लक्ष लागले आहे. अन्यथा, पर्यटन विकासाच्या नावाखाली रोठा सुपारीची ओळख आणि स्थानिक शेती संस्कृती पर्यटनाच्या लाटेत वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रारंभी मिळालेल्या निधीतून केंद्राच्या सीमांकनासाठी काटेरी तारांचे कुंपण, छोटी विहीर, प्रवेशद्वार तसेच सपाटीकरणाची कामे करण्यात आली.

सध्या प्राप्त असलेला अनुदानातून या खरीप हंगामापासून सुरवातीला सुपारी पिकांची लागवड, शेततळे, विहीर आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासोबतच कार्यालयीन इमारत आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजुरीचे प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या निधीनुसार बांधकामाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील.

डॉ. प्रशांत शहारे
संशोधन संचालक
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली

दिवसेंदिवस वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे बांधकामांसाठी नारळी-सुपारींच्या बागांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे. एकेकाळी हिरवाईने नटलेलं, नारळ-सुपारीच्या सावलीत विसावलेलं निसर्गरम्य दिवेआगर गाव आता हळूहळू आपली मूळ ओळख गमावत चाललं आहे. श्रीवर्धनची ओळख असलेल्या प्रसिद्ध रोठा सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी तसेच नारळ-सुपारी पिकांच्या लागवडीला पुन्हा चालना देण्यासाठी हे सुपारी संशोधन केंद्र लवकरात लवकर सुरू होणे अत्यावश्यक आहे.

विरेंद्र कुलकर्णी
नारळ-सुपारी बागायतदार दिवेआगर

Related

Tags: Betel nut research center on paper onlyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial news
Previous Post

विंधणेत शेतकऱ्यांसाठी जनजागृती बैठक

Next Post

चोंढी रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आरडीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

आरडीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

April 13, 2026
ओंकार क्रीडा मंडळ वेश्वी आयोजित कबड्डी स्पर्धेत मरीआई धेरंड संघ विजेता
अलिबाग

ओंकार क्रीडा मंडळ वेश्वी आयोजित कबड्डी स्पर्धेत मरीआई धेरंड संघ विजेता

April 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

चाकूचा धाक दाखवून लूट

April 13, 2026
विळे येथे महाराजस्व समाधान
माणगाव

विळे येथे महाराजस्व समाधान

April 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

बल्करच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

April 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

माणगावात भरदिवसा घरफोडी

April 13, 2026
Next Post
चोंढी रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी

चोंढी रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?