। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीतील बीपीसीएल कंपनीतून अज्ञात चोरट्याने 11 लाख 28 हजार 360 रूपये किंमतीची दोन कॉपर केबलची बंडल चोरून नेल्याची घटना घडली. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे बॉट प्लॉटमधून अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरिता लबाडीच्या इराद्याने व कंपनीच्या मालकाच्या संमतीशिवाय 11 लाख 28 हजार 360 रूपये किंमतीची दोन बंडल अंदाजे लांबी 2 हजार मिटर चोरून नेली असून, अज्ञात चोरट्यांचा तपास रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मंगेश बाचकर अधिक तपास करीत आहेत.







