| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत- कशेळे मुरबाड रस्त्यावरील पडलेले खड्डे भरून डांबरीकरणास सुरुवात झाली आहे. कशेळे गावातील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशी यांनी यासाठी मुंबई पर्यंत जाऊन पाठपुरावा केला होता. कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या शहापूर मुरबाड कर्जत खोपोली.या राष्ट्रीय महामार्ग 548 अ वरील कशेळे भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण झालेले नाही. त्या ठिकाणी रस्ता डांबरी असून, काँक्रीटीकरण करण्यात आले नसल्याने येथील रस्ता खड्ड्यात हरवला होता. रस्ता खड्डेमय झाल्याने त्या ठिकाणी असलेले दुकानदार आणि स्थानिक यांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे लक्षात घेऊन ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी मुंबई येथे राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे जाऊन आपल्या भागातील त्याचे काम करण्याची मागणी लावून धरली होती. ही बाब लक्षात घेऊन कर्जत- कशेळे- मुरबाड रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ-मोठे खडे पडले होते. त्यामुळे अनेक वाहनांचा अपघात होत होते. हे अपघात थांबावा यासाठी कशाला येथील ग्रामस्थांनी अर्ज करून मागणी करण्यात आली होती. अखेर राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून ग्रामस्थांचे मागणीला यश आले असून खराब रस्त्यावर डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. कशेळे बाजारपेठ येथील डांबरीकरण करण्यात येत असून सुगवे येथील खड्डे देखील भरले जात आहेत.







