| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बोटीमधील पंख्याला अडकून पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.24) नवगाव समुद्रकिनाऱ्यापासून एक किलो मीटर अंतरावर समुद्रात घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र निशाद असे या मृत कामगाराचे नाव आहे. तो नवगाव येथील रहिवासी असून तो बोटीमध्ये मासेमारीचे काम करीत होता. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा इसम नवगाव बंदराजवळील समुद्रात असलेल्या बोटीवर शौचास बसला होता. त्याचा तोल जाऊन समुद्रात पडला. मात्र बोटीतील पंख्याला तो अडकल्याने त्याच्या अंगावर जखमा झाल्या. त्याला पाण्यातून बाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे पाण्यात बुडून तो बेशुध्द झाला. ही बाब बोटीतील मंडळीच्या लक्षात आल्यावर त्याला तात्काळ अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघात विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात रात्री उशीरा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अरविंद निशाद यांनी फिर्याद नोंदविली आहे.







