| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड परेशनाका-एकदरापुल रस्त्यावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी सर्पमित्र संदीप घरत यांनी केली आहे. परेशनाका-एकदरापुल रस्त्यावर नुकतेच दुरुस्ती व डांबरीकरण काम करण्यात आले आहे. हे काम करत असताना गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात न आल्याने टू -व्हीलर, थ्री -व्हीलर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते तर कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन परेशनाका-एकदरापुल रस्त्यावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी घरत यांनी केली आहे.







