। धाटाव । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील कोकबन येथील मातोश्री रिसॉर्टमध्ये कृषी विद्यापीठ किल्ला व बीजामृत फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी पंचायत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आधुनिक व सेंद्रिय शेतीविषयी माहिती दिली. कार्यक्रमास डॉ. मनोज तलाठी, डॉ. मांजरेकर, डॉ. आरेकर, डॉ. कार्ले, तेजस्विनी वाजंत्री, शैलेश कोल्हटकर, रमेश म्हात्रे, अशोक ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
डॉ. कार्ले यांनी रासायनिक व सेंद्रिय खतांमधील फरक तसेच रासायनिक खतांच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या पीक व कृषी योजनांबाबत ऑनलाइन टठ कोडच्या माध्यमातून घरबसल्या मार्गदर्शन मिळावे, यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन वाजंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन श्री धावीर महाराज सेंद्रिय गटाचे अध्यक्ष भारत खाडे यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







