। पनवेल । प्रतिनिधी ।
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा आणि 30 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून कामोठ्यातील एका व्यक्तीची तब्बल 8 लाख 95 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुहास फडतरे यांना फेसबुकवरून आरोपीने संपर्क साधला होता. त्यानंतर व्हॉट्सॲप नंबर देऊन क्रिप्टो करन्सी प्लॅटफॉर्म बाबत माहिती दिली. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला तक्रारदाराकडून 10 हजार रुपये गुंतवून घेतले. त्यानंतर 11 हजार 797 रुपये परताव्यासह त्यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर फडतरेला आरोपीने टेलिग्रामवरील गुंतवणूक सल्लागार गटात सहभागी करून घेतले. नफ्यावर 30 टक्के कमिशन देण्याचा ऑनलाईन करार करून वेळोवेळी रक्कम गुंतवण्यास भाग पाडून एकूण 8.95 लाख रुपयांची फसवणूक केली.







