| पनवेल | प्रतिनिधी।
विना परवाना देशी दारुच्या बाटल्या जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून हा साठा हस्तगत केला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथील एका किराणा दुकानात एक व्यक्ती देशी दारुच्या बाटल्या ताबेकब्जात बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हजरत अली पठाण, पो.शि.साईनाथ मोकळ, काकडे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास 9 हजार 520 रुपये किंमतीच्या देशी दारु संत्रा बाटल्या हस्तगत केल्या आहेत.







