। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
गोरेगाव येथे विष्णु तलावाचे पश्चिमेडील रोडवर सोमवारी (दि. 29) एकूण दोन लाख 56 हजार पाचशे रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या बांगडया दोन अज्ञात इसमाने फिर्यादी रा. द्वारका निवास विष्णु तलावाजवळ गोरेगाव यांची फसवणुक करून चोरी करुन मोटारसायकल वर पळुन गेले आहेत. याबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार एस.एस.सानप हे करीत आहेत.