डिझेल इंजिन, मोटार सायकल व सोन्याचे दागिने चोरीला
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगडात दिवसेंदिवस चोर्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मोटार सायकल, दागिने, घरफोडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रायगडातील नेरळ, अलिबाग व माणगाव येथे चोर्या झाल्या आहेत. नेरळ मध्ये 6 हजार आठशे रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व घरातील वस्तूंची चोरी झाली आहे तसेच माणगााव मध्ये कालवण या ठिकाणी 20 हजार रुपये किंमतीचे डिझेल इंजीन चोरीला गेले तर अलिबाग येथे 30 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल चोरीला गेली. याबाबत सदरच्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.