| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणेपासून पेण तालुक्यातील डोलवीपर्यंतच्या सुमारे 40 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागोठण्याजवळील चिकणी येथील के.टी. बंधारा परिसरातील जेएसडब्ल्यू कंपनीची जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नागोठण्यातील नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत व संदीप राऊत यांनी येथील कुंभार आळी, मराठा आळी, गवळआळी आणि रमाईनगर परिसरातील सुमारे 1 हजार घरांमध्ये पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. या उपक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. यावेळी केएमजी विभागातील प्रवीण आमडोसकर, सुनील धुमाळ, सुजित पाटील, शेखर जोगत, सूरज तळेकर, मयूर पाटील, निशांत पाटील, प्रशांत नाकते, यश आमडोसकर, सुशांत धुमाळ, ऋषिकेश भगत, गौरव वाघमारे, प्रमोद महाडिक, संचित भगत, रोहित कळमकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.







