| नवीन पनवेल | प्रतिनिधी ।
रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील चालक आणि प्रवासी जखमी झाल्याची घटना उरण ते पनवेल रोडवर पुष्पक नगर समोरील ब्रिजच्या शेजारी घडली. या अपघाताप्रकरणी व्हॅगनार कार चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 26 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील व्हॅगनार कारवरील आरोपी चालकाने रिक्षा क्रमांक एमएच 46 एझेड 8786 ला मागून येऊन धडक दिली. या अपघातात रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक फिरोज कादिर शेख हा जखमी झाला, तसेच रिक्षातील प्रवासी यांना किरकोळ दुखापती झाले आहेत. 26 जुलै रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास फिरोज शेख (रा. तळवली जासई) हा रिक्षात प्रवासी भरून पनवेलकडे येत होता. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून, व्हॅगनार कारचालक रिक्षातील जखमी इसमाना मदत न करता पळून गेला आहे.






